दुकानाची तोडफोड करत कामगाराला मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Crime-car-driver-assult.jpg)
पिंपरी चिंचवड | दोन अनोळखी मुलांनी दुकानाची तोडफोड करत दुकानात काम करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाला आणि दुकानदाराला आरोपींनी बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 18) दुपारी आदर्शनगर, दिघी येथील कुणाल कम्युनिकेशन या दुकानात घडली.
सुरज मुरलीधर सागवेकर (वय 25, रा. आकुर्डी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागवेकर यांचे आदर्शनगर, दिघी येथे ममता स्वीट चौकात कुणाल कम्युनिकेशन नावाचे दुकान आहे. रविवारी दुपारी पाच वाजता साक्षी घाग या महिला दोन अनोळखी मुलांसोबत आल्या.
फिर्यादी यांच्या दुकानात काम करणारा मुलगा गौरव याने साक्षी यांच्या मुलीचा हात का पकडला, या कारणावरून दोन अनोळखी मुलांनी गौरव आणि फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दुकानाची तोडफोड केली. एकाने फिर्यादी यांना दुकानातील स्टूल मारून जखमी केले. तसेच दुकानातून जाताना आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा कामगार गौरव या दोघांना बघून घेण्याची धमकी दिली.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.