पिंपरी / चिंचवड

वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटकाच्या वाहनाची तोडफोड

पिंपरी | प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक अमित वाघमारे यांच्या कारची दोन अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे घडली.

अमित उर्फ साई प्रदीप वाघमारे (वय 35, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित वाघमारे हे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक आहेत. रविवारी रात्री त्यांनी त्यांची कार मोशी प्राधिकरण येथील कार्यालयासमोर पार्क केली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. त्यातील एकाने कारच्या समोरील बाजूला आणि एकाने कारच्या मागील बाजूला दगड मारून कारचे नुकसान केले. त्यानंतर दोघेजण दुचाकीवरून निघून गेले.

अमित वाघमारे हे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. हा हल्ला राजकीय आकसापोटी केला असल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांनी केलेला हा भ्याड हल्ला म्हणजे माझ्या समाजकार्याची पावती आहे. विरोधकांनी मला धमकवण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांची हरलेली मानसिकता दर्शविते, असे अमित वाघमारे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button