दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा गजाआड, १८ दुचाकी हस्तगत, हिंजवडी पोलिसांची मोठी कामगिरी
शेतकऱ्यांना कमी किंमतीत दुचाकी विकल्याचे निष्पन्न
![Two-wheeler thief, Attal Chorta, Gajaad, 18 two-wheeler seized, Hinjewadi, Police's great achievement,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Hinjewadi-Police-700x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिसांनी मोठी कामगिरी केल्याचं समोर आले आहे. शहरी भागातून वाहनांची चोरी करून परभणी सारख्या ग्रामीण भागात दुचाकी विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने शेतकऱ्यांना कमी किंमतीत दुचाकी विकल्याचे निष्पन्न झाले आहे.
रवि परमेश्वर धांडगे (23, रा. पाथर गव्हाण ता. पाथरी, जि. परभणी), विकास उद्धव धांडगे (पाथर गव्हाण ता. पाथरी, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी हिंजवडी येथील एक कंपनी समोरून भर दिवसादुचाकी चोरीला गेली. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना एकच चोरटा हिंजवडी परिसरात वारंवार वाहन चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडी ते सुपा अहमदनगर या मार्गावरील तब्बल ३६० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून आरोपीचे नाव निष्पन्न करत पोलिसांनी रवी धांडगे याला अटक केली.
आरोपी रवी परभणी जिल्ह्यातून अधून मधून हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात राहण्यासाठी येत असे. हिंजवडी परिसरात राहून तो दुचाकी चोरी करून गावाकडे घेऊन जात. तिथे विकास उद्धव धांडगे याला चोरीची वाहने विकत असे. विकास हा गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गाडीची कागदपत्रे दोन दिवसात आणून देतो असे खोटे सांगून त्यांना दुचाकी विकत असे. विकास याच्याकडून १५ तर रवी यांच्याकडून तीन दुचाकी अशा एकूण ५ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ही कामगीरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे, सोन्या बापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापु घुमाळ, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.