पिंपरी / चिंचवड

तळेगाव दाभाडे येथे दोन घरफोड्या : पावणे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत घरातून एक लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम तर दुस-या घटनेत पावणे दोन लाखांचे दुकानातील साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 7) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत प्रशांत महादेव खेडकर (वय 38, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुट्टीवर गेल्याने त्यांचे तळेगाव दाभाडे येथील घर कुलूप लावून बंद होते. 25 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख तीन हजार 700 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

दुस-या घटनेत रवींद्र ज्ञानोबा तांबडे (वय 33, रा. सोमाटणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शंकरवाडी येथे डी जी पावर सर्व्हिसेस जनरेटर सेल्स अँड सर्व्हिस या नावाचे दुकान आहे. 5 मार्च सायंकाळी सहा ते 7 मार्च सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून एक लाख 69 हजारांच्या केबल चोरून नेल्या. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button