दिघी आणि पिंपरीत विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी
दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात सहा तर दिघी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आकाश गणेश शिर्के, गणेश बाळू शिर्के, विशाल गणेश शिर्के, सागर गणेश शिर्के आणि दोन महिला (सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्यांच्या माहेरच्या लोकांविषयी वाईट बोलून फिर्यादी यांना त्रास दिला. फिर्यादी आणि त्यांच्या भावाला आरोपींनी वाईट वाईट शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
तुकाराम कुंडलिक जायभाये, कुंडलिक रंगनाथ जायभाये, ज्ञानेश्वर काशिनाथ जायभाये आणि दोन महिला यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला तिच्या आई वडिलांकडून पैसे आणावे म्हणून टोमणे मारून मानसिक व शारीरिक त्रास दिला. शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादीला तिच्यासाठी आणि मुलीसाठी लागणा-या खर्चाला पैसे न देता सासरी नांदवण्यास फिर्यादीला नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.





