breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक; दहा किलो गांजा जप्त

पिंपरी  : गांजा विक्रीप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 2) सायंकाळी सिद्धार्थ नगर, दापोडी आणि हातगावकर चाळ, दापोडी येथे करण्यात आली.

सचिन यादव अडागळे (वय 35, रा. दापोडी), सोहेल बबलू कुरेशी (वय 22, रा. दापोडी) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांचा साथीदार फिरोज उर्फ बा दिलावर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा  –  ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशिराने दिली, पुणे पोलीस दलातून 2 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन अडागळे हा गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाल्याने भोसरी पोलिसांनी त्याला सिद्धार्थ नगर दापोडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 90 ग्रॅम वजनाचा नऊ हजार 500 रुपयांचा गांजा जप्त केला.फिरोज शेख आणि सोहेल कुरेश यांच्याकडून सचिन याने गांजा आणल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी फिरोज आणि सोहेल यांच्या खोलीत छापा मारून कारवाई करत 10 लाख 20 हजार रुपये किमतीचा 10 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button