विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमातून तिरंग्यास मानवंदना!
संत साई इंग्लिश स्कूल; जल्लोषपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-14-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : भोसरीतील जगद्गुरु महात्मा बसवेश्वर गुरुकुलच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, ढोल ताशे आणि बँड वाद्यांच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीच्या घोषणाही दिल्या.
कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर उद्योजक आशिक शामानोर , विठ्ठल वाळुंज, शिक्षक पालक संघाचे अजित मेदनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार , धूप दीप समर्पित करून पूजन करण्यात आले. तसेच जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे सुद्धा यावेळी पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल ओमप्रकाश मसरकल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हेही वाचा : अर्थव्यवस्था वाढण्यासाठी शेती, शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक; हर्षवर्धन पाटील
शिक्षिका गुडिया सिंग यांनी प्रास्ताविक केले. श्वेता नारायणगावकर , शुभांगी काटे उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर , उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम , प्राथमिक विभाग प्रमुख स्वाती मोघे, आरती मुदशेट्टीवार, मनोज वाबळे, संजय अनर्थे, काशिनाथ कतनाळी, प्रमोद शिंदे, भागवत वानखेडे, विठ्ठल पुंडे, अक्षय राणे, अनिता गव्हाणे, अरुणा कुंभार, सविता दाते, आरती लांडगे, गायत्री देवकर, मेघा पाटील यांची उपस्थिती होती.