पिंपळे निलखवासियांकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप श्रद्धांजली
![Tribute to late MLA Laxman Jagtap from Pimple Nilkhawasian](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/ेsanketchonde-pcmc-780x470.jpg)
– सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची सामूहिक आदरांजली
– असा लढवय्या लोकनेता होणे नाही; नागरिकांच्या भावना
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपळे निलखवासीयांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. आमदार जगताप यांच्या प्रतिमेस प्रभागातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रभागातील नगरसेविका आरतीताई चोंधे, काँग्रेस महाराष्ट्र कमिटी सचिव सचिन साठे, ‘पीसीएमटी’चे माजी सभापती दिलीप बालवडकर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, भुलेश्वर नांदगुडे, नितीन इंगवले, तात्या कामठे, एसीपी श्रीकांत पाटील, नरेंद्र गायकवाड, जयसिंग डुंबरे सर, अलका मकवाना, कल्पना सदाकाळ, भरत इंगवले, सुधाकर वेदपाठक, सुभाष इंगळे, मोहित नागावकर, सुवर्णा गाडे, गीता जगताप, वेदवंती उपाध्याय, विमल गायधनकर, कुंदा पाटे, उज्वला पोवार, अनिल संचेती, प्रवीण मंडारे, विठ्ठल चौधरी, विशाल मड्डमवार, बाळासाहेब इंगवले, राकेश गिरमे, एस बी पाटील, अनंत गर्जे, रंगराव माने, नंदकुमार बालवडकर, संदीप बोडके, काळूराम नांदगुडे, रामचंद्र गायधनकर, राजेंद्र जगताप, दीपक मोकाशी, गोडंमपल्ली, नागेश जाधव, राहुल पठारे, पवन कामठे आदी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार जगताप यांच्या आठवणींना उजाळा…
पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय तसेच विकासात्मक जडण-घडणीमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान आहे. सुमारे ३५ वर्ष शहराच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात कारकीर्द यशस्वी करणारे जगताप यांनी पिंपळे निलख आणि परिसराच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.