Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागपंचमीनिमित्त बोपखेलमध्ये रंगले पारंपरिक खेळ ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • माजी सभापती चेतन घुले यांचा महिलांसाठी उपक्रम
  • माजी उपमहापौर हिरानानी घुले यांची उपस्थिती

पिंपरी : नागपंचमीनिमित्त बोपखेल परिसरातील महिलांसाठी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी ‘‘उत्सवांची रंग धमाल’’ हा उपक्रमाचे आयोजन केले. त्याअंतर्गत परिसरातील महिलांसाठी झोका, फुगडी, फेर, मंगळागौर आदी पारंपरिक खेळ घेण्यात आले. स्पर्धा, खेळ , किस्से आणि गप्पा-गाणी अशी धम्माल महिलांनी उडवून दिली.

दरम्यान, या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बोपखेल गावठाण येथील मारुती मंदिरासमोर विविध खेळांचे नियोजन करण्यात आले. सहभागी महिलांना लकी ड्रॉ काढून पैठणी भेट देण्यात आली.

कोविडच्या दोन वर्षांच्या संकटामुळे महिला- माता- भगिनींना एकत्र येता आले नाही. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने परिसरातील महिलांना एकत्रितपणे पारंपरिक खेळ खेळता आले. तसेच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय सण -उत्सव जोपासला जात आहे, याबाबत महिलांनी समाधान व्यक्त केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button