पिंपरी / चिंचवड

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

खिडकीतून पाणी सांडले या कारणावरून झालेल्या भांडणातून तिघांनी मिळून एका महिलेचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास सोमेश्वर गार्डन जवळ, प्राधिकरण, निगडी येथे घडली.

ज्ञानेश्वर सासवडकर, श्रीकांत सासवडकर आणि राजेश स्वामी (तिघेही रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी राहात असलेल्या बिल्डींगमध्ये साफसफाई करत असताना खिडकीतून पाणी सांडले. यावरून त्यांचे सासू-सासरे शिवीगाळ करत असताना त्यांचे शेजारी आरोपी ज्ञानेश्वर सासवडकर यांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच आरोपी श्रीकांत सासवडकर आणि राजेश स्वामी हे फिर्यादी यांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button