ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघे अटकेत
![बीडमध्ये पेपरफुटी टळली; म्हाडाच्या परीक्षा केंद्रात डमी विद्यार्थ्याला अटक, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/arrest-0-1.jpg)
पिंपरी चिंचवड | दुचाकी गाडीच्या डिक्कीत पिस्तूल व लोखंडी कु-हाड बाळगल्याप्रकरणी दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी गुरुवारी (दि. 09) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.ओंकार विजय मोकाशी (वय 25) व पॅडी संदीप तावरे (वय 19)(दोघेही रा. कोंढवेधावडे गावठाण, पुणे) असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक रामदास मोहीते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एम एच 12 केव्ही 5881 या दुचाकीच्या डिक्कीत 40 हजार किंमतीचे पिस्तूल, लोखंडी कु-हाड बाळगली होती. दोघांना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.