पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील प्रकार हा काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा कट !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-08-at-10.07.31-AM.jpeg)
- पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची टीका
- चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर चौकात भाजपाचा मशाल मोर्चा
पिंपरी । प्रतिनिधी
पंजाबमधील फिरजपूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षतेत राज्यातील काँग्रेस सरकारने दुर्लक्ष करून मोठी चूक केली आहे. परंतु, देवाच्या कृपेने पंतप्रधान या हल्ल्यातून सूखरूप वाचले. यापूर्वी सुरक्षेच्या त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षतेत केलेला निष्काळजीपणा हा अक्षम्य गुन्हा आहे आणि काँग्रेस प्रणित पंजाब सरकारचा कट आहे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे चिंचवड गावातील चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधू समूहशिल्प ते चापेकर स्मारक वाडा असा मशाल मोर्चा काढून काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला, अशी माहिती आयोजक सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी दिली.
![The type of PM's visit to Punjab is a conspiracy of Congress-led Punjab government!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-08-at-10.07.30-AM-300x200.jpeg)
यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, माजी नगरसेवक सुरेश गदिया, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, शिक्षण मंडळ माजी सदस्य गजानन चिंचवडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चौंधे, भाजपा ओबीस आघाडीचे प्रदेश सचिव प्रदिप सायकर, प्रदेश युवती विभाग सहसंयोजिका, वैशाली खाडे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, शहर उपाध्यक्ष सचिन राऊत, किरण पाटील, रविंद्र देशपांडे, विक्रम कलाटे, देवदत्त लांडे, मधुकर बच्चे, पोपट हजारे, मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, महादेव कवीतके, विजय सिनकर, विनोद तापकीर यांसह अंतरा देशपांडे, सोनम गोसावी, कविता हिंगे, प्रियांका शहा, राजेंद्र ढवाण, अमेय देशपांडे, दिपक नागरगोजे, राहुल खाडे, रविंद्र प्रभुणे, राघूशेठ चिंचवडे, राजन पाटील, विजय कदम, सतपाल गोयल, सनी बारणे, दिगंबर गुजर, सतीश नागरगोजे आदींसह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत झालेल्या प्रकाराचा निषेध करीत आहे. प्रत्येकाला देश आणि देशाचे पंतप्रधान यांच्याबाबत स्वाभीमान आहे. भारत जगातील महासत्ता व्हावा, असे प्रत्येकाचे स्वप्न आहे.हा देश महासत्ता करण्याचे धाडस व जिद्द पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे. त्यांच्यावर अशा प्रकारचे कारस्थान काँग्रेसच्या नेत्यांनी केले. पण, ‘प्रथम राष्ट्र’ या एका शब्दावर भाजपा हा पक्ष वाढला आणि वाटचाल करीत आहे, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.