शेतातील तार कंपाउंडच्या कारणावरून दोघांना मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
शेतातील तार कंपाउंडच्या कारणावरून पाच जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी तीन ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.
शांताराम किसन पाटोळे, गौरव शांताराम पाटोळे, विजय किसन पाटोळे, किसन पाटोळे आणि एक महिला (सर्व रा. बनकर वस्ती, चिंबळी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल दिपक झोडगे (वय 33, रा. बनकर वस्ती, चिंबळी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या शेतात तार कंपाउंड केले आहे. कंपाउंडचा पोल महिला आरोपी पाडत असल्याने फिर्यादी यांनी तिला विचारणा केली. त्यावर तिने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी शांताराम आणि विजय यांनी फिर्यादीस फोनवरून शिवीगाळ करून ‘तू चिंबळी येथे आल्यावर तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी दिली.
फिर्यादी घरी जात असताना गर्दी जमवून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आरोपींनी त्यांना देखील मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून गावातील नागरिक आले आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला भांडणातून सोडवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.