Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा थरार

अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी; शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण

पिंपरी : ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा आज पिंपरी-चिंचवड शहरातून यशस्वीपणे पार पडला. या स्पर्धेदरम्यान शहरातील विविध प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी सायकलपटूंचे टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात स्वागत केले तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. यामुळे संपूर्ण शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचा हा अंतिम टप्पा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून दुपारी १.३० वाजता सुरू होऊन पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता संपन्न झाला. एकूण ९९.१५ किलोमीटर अंतराच्या या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील राजीव गांधी ब्रिज (औंध), काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, स्पाईन रोड, जुना आरटीओ रोड, आयुक्त बंगला, एम्पायर इस्टेट ब्रिज अशा महत्त्वाच्या मार्गांवरून सायकलपटूंनी मार्गक्रमण केले.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (UCI) निकषांनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत स्पर्धेसाठी केलेली पूर्वतयारी प्रत्यक्षात प्रभावी ठरली. रस्त्यांचे डांबरीकरण, चेंबर्स समपातळीवर आणणे, बीआरटी रेलिंगची दुरुस्ती व रंगरंगोटी, चौकांचे सौंदर्यीकरण, थर्मोप्लास्टिक पेंटिंग, पुलांचे सुशोभीकरण तसेच संपूर्ण मार्गाची विशेष स्वच्छता यामुळे शहराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चेहरा नागरिकांपुढे आला.

हेही वाचा – ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार  

स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, वैद्यकीय व आपत्कालीन सेवा यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. काही वेळासाठी वाहतूक वळविण्यात आली असली तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत संयम राखला आणि स्पर्धेचा आनंद घेतला.

भित्तिचित्रे, सजावट आणि रस्त्यावरील शिस्तबद्ध नियोजनामुळे पिंपरी-चिंचवड शहरात क्रीडा, संस्कृती आणि जागतिक क्रीडा स्पर्धेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या संपूर्ण नियोजनामुळे पिंपरी-चिंचवड शहराने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button