Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुरूच

पिंपरी : नवीन वर्षाच्या सुरूवातीला सुरू झालेली वाहनांच्या तोडफोडीची मालिका अद्यापही सुरूच आहे. एक हजार रुपयांच्या हप्त्यासाठी तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना दिघीतील श्रीराम कॉलनी येथे घडली.

रमेश रामराव श्रंगारी (वय ४२, रा. स्वराज कॉलनी, गजानन महाराजनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम नवनाथ जाधव उर्फ त्रिवेश चंद्रकांत गुंजाळ (वय १८), आणि साहिल विजयकांत सांगुळे (दोघे रा. गजानन महाराजनगर, दिघी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रमेश हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन भाडे करण्यासाठी घरातून निघाले. गाडी पार्कीगजवळ ते गेले असता तेथे आरोपी प्रेम जाधव आला. त्याने तु गाडी पार्कींग करतो ना येथे, मग मला दारु पिण्यासाठी एक हजार रुपये दे. नाही तर तुझी गाडी फोडून टाकतो, अशी फिर्यादीला धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी रमेश हे माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हणाले. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने तुला दाखवतो आता, असे म्हणत शिवीगाळ केली.

हेही वाचा –  भर रस्त्यात पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

त्यानंतर शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी आरडाओरडा करीत फिर्यादी यांचे नाव घेत कॉलनीमध्ये पुन्हा शिवीगाळ केली. रमेश तुला सोडत नाही, असे मोठमोठ्याने ओरडत होते. त्यावेळी कॉलनीमधील सर्व लोक जागे होऊन रस्तावर काय झाले बघण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी आरोपींनी हवेत कोयता फिरवत कॉलनीमध्ये दहशत निर्माण केली. फिर्यादी व इतर दोन जणांच्या गाडीच्या काचा आरोपीने फोडून नुकसान केले. या दहशतीला घाबरून नागरिकांनी दारे खिडकी बंद करुन घेतल्या.

दिघी पोलीस तपास करीत आहेत. तोडफोडीचे सत्र सुरूच नवीन वर्षाच्या सुरूवातीला आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी पावणेबाराच्या सुमारास भोसरीमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आता पुन्हा दिघी परिसरात हा प्रकार घडल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button