Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टीमकडून आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ आरोपींच्या ताब्यातून ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा आणि दोन स्कोडा चारचाकींसह एकूण ४२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून २६ डिसेंबर रोजी पहाटे प्रिंस्टीन कन्स्ट्रक्शनसमोर (जुना पुणे–मुंबई महामार्ग, आकुर्डी) नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातील गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अटक आरोपींमध्ये नुरमोहमद शेख, आयेशा शेख, मोहियोद्दीन कुरेशी आणि रेश्मा मोहिते यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपींवर पूर्वीचेही गुन्हे असल्याचे उघड झाले.

हेही वाचा      :            पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : ५,९६१ नामनिर्देशन अर्जांची विक्री, ५७४ अर्ज दाखल 

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीमुळे तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी “शून्य सहनशीलता” धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.

अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शिवाजी पवार (उप आयुक्त-गुन्हे), प्रविण मोरे (सहाय्यक पोलिस आयुक्त-गुन्हे २) यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील व पथकाने केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button