Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘माझा फोन टॅप केला जातोय’, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधानांकडून माझा फोन टॅप केला जात असून, माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत,” असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवरून राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

व्हिडिओमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “माझ्या सर्व आरोपांना पुष्टी देणारी महत्त्वाची माहिती आणि पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. पंतप्रधानांना हे सर्व माहीत आहे, कारण त्यांनी माझा फोन टॅप केला आहे. जेव्हा ते समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, तेव्हा कोण परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत आहे, खरा देशद्रोही कोण आहे आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे, हे सर्वांसमोर स्पष्ट होईल.”

हेही वाचा

संविधान दिनानिमित्त PCMC मध्ये व्यापक जनजागृती उपक्रम राबवा!

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट समोरासमोर खुल्या चर्चेचे (Open Debate) आव्हान दिले आहे. संसदेत आपला माईक बंद करून आपल्याला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, कृषी कायदे, एसआयआर, चीनचा मुद्दा, जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा विषय किंवा एपस्टीन प्रकरण अशा अनेक विषयांवर त्यांना संसदेत रोखण्यात आले.

पुढे आव्हान देताना ते म्हणाले की, “आता भाषणं देण्याऐवजी एकाच टेबलावर समोरासमोर बसून एकमेकांना थेट प्रश्न विचारण्याची आणि आव्हाने देण्याची माझी इच्छा आहे. या चर्चेचे पंच म्हणून गौतम अदाणी किंवा मोहन भागवत यांची निवड केली तरी मला काहीही हरकत नाही; मात्र मी खात्री देतो की माझ्यासोबत समोरासमोर चर्चा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहू शकणार नाहीत.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group