पोलीस भरतीच्या परीक्षेत मास्क मधील आधुनिक कॉपी ‘अशी’ होती !
!['No mask, no entry' from APM due to Omoycron crisis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/maharashtra-times-e1637546715273.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि.19) विविध परिक्षा केंद्रावर पार पडली. या परीक्षेत आधुनिक कॉपीचा प्रकार समोर आला, यामध्ये परीक्षार्थीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनकारक असलेल्या मास्कचा पुरेपुर फायदा घेऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक कॉपी केली होती. ही ‘आधुनिक कॉपी’ नेमकी कशी होती हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या परिक्षेसाठी एका बहाद्दराने या मास्कचा पुरेपुर फायदा घेतला. पठ्याने मास्कच्या आत मोबाईल सद्दृश उपकरण तयार केले होते. यासाठी त्याने बॅटरी, चार्चिंग केबल, बोलण्यासाठी माईक, स्पिकर तसेच संपर्कासाठी सिमकार्ड आणि इतर तांत्रिक जोडणी केली होती. या माध्यमातून बोलण्यासाठी व ऐकण्यासाठी व्यवस्था या कॉपी बहाद्दराने मास्कच्या आतमध्ये केली होती.
पोलिसांच्या एका पथकाने परीक्षा केंद्रातील परिक्षार्थी यांची छाननी केली त्यावेळी सर्व उमेवाराचे मास्क देखील तपासण्यात आले. दरम्यान, या उमेदवारचा मास्क तपासला असता तो जड असल्याचे जाणवले, म्हणून तपासणी केल्यावर मास्कमध्ये कॉपीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या उमेदवारावर परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, बावधन येथील एका परिक्षा केंद्रावर याच परिक्षेसाठी डमी परीक्षार्थी बसल्याचे निष्पण्ण झाले आहे. याप्रकरणी मूळ परिक्षार्थी आणि डमी असे दोघांनाही अटक करण्यात आली आहे.