ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

वर्गातील मशीन लर्निंगपासून उद्योगातील एआयपर्यंतचा प्रवास

शिक्षण विश्व: एमआयटी आळंदी येथे प्रेरणादायी विशेष व्याख्यान

आळंदी, पुणे | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (दे.), पुणे येथे उन्नत भारत अभियान समिती व गणित विभागाच्या संयुक्त विद्यमाने “From Classroom ML to Industry AI: Building Sustainable, Responsible and Community-Centric Intelligence” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिओहॉटस्टार येथे डेटा, एआय आणि बॅकएंड अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री. मयूर मदनानी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. हनुमंत मावकर यांनी प्रमुख अतिथींच्या परिचयाने केली. त्यानंतर गणित विभागाच्या विभागप्रमुख सौ. सुषमा चालके यांच्या हस्ते श्री. मदनानी यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात श्री. मयूर मदनानी यांनी वर्गात शिकविल्या जाणाऱ्या मशीन लर्निंग संकल्पनांपासून उद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींपर्यंतचा प्रवास अत्यंत सोप्या, समजण्यासारख्या आणि व्यावहारिक उदाहरणांद्वारे स्पष्ट केला. त्यांनी उद्योगक्षेत्रात एआय प्रणाली विकसित करताना येणाऱ्या डेटा व्यवस्थापनातील अडचणी, मॉडेल डिप्लॉयमेंट, मॉनिटरिंग तसेच जबाबदार आणि शाश्वत एआय विकसित करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

हेही वाचा      :              भूसंपादनासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उन्नत भारत अभियान समन्वयक डॉ. श्रीराम कारगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, गणित विभागप्रमुख सौ. सुषमा चालके, गणित विभागातील सर्व प्राध्यापक, उन्नत भारत अभियान समिती तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

एकूण १२४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग…

तसेच एआय प्रणालींचे मूल्यमापन करताना केवळ अचूकतेवर भर न देता त्यांची विश्वसनीयता, स्केलेबिलिटी, खर्च-परिणामकारकता आणि समाजावर होणारा परिणाम यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील अपेक्षा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मिळाला. हा कार्यक्रम बी.एस्सी. (AI & ML) तसेच एस.वाय. एम.एस्सी. (IMCA) या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात एकूण १२४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button