breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, मोकळा श्वास कधी घेणार?

पिंपरी | पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. रविवारी सकाळी इंद्रायणी नदीच्या पृष्ठभागावर घातक फेसाचा जाड थर तरंगताना दिसला. इंद्रायणी नदीचा पांढरा फेस कायम असून, इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.

इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. आज आळंदी येथील सिद्धबेट जवळील बंधाऱ्या खालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले. एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पुण्यातील आळंदी शहरातील इंद्रायणी नदीच्या पृष्ठभागावर विषारी फेसाचा जाड थर तरंगत आहे.

हेही वाचा     –      Maharashtra Weather | पुढील ३ ते ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

गेल्या वर्षी जूनमध्ये जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषित करणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. हे जलप्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य त्याबाबत उपाय योजना करणे गरजेचे आहे. जलप्रदूषण करणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button