‘झेड एफ इंडिया’ च्या कर्मचाऱ्यांना चाकणमधील सर्वाधिक वेतनवाढ
![The highest pay hike in Chakan for ZF India employees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/maheshlandge-pcmc.jpeg)
स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना अन् कंपनी व्यवस्थापनात करार
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
झेड एफ इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल २२ हजार ६७८ रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. चाकण औद्योगिक पट्यामधील कंपन्यांमधील ही सर्वाधिक वेतनवाढ आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेत वेतनवाढ करार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे, कंपनी प्लांटहेड निलेश फणसे, संघटनेचे उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, महादेव येळवंडे, निलेश मुळे, साईराज येळवंडे, तेजश बीरदवडे, प्रशांत पाडेकर , रविंद्र भालेराव, युनिट अध्यक्ष तुषार पवळे, उपाध्यक्ष विक्रम सुक्रे, सरचिटणीस राहुल भोसले, सहचिटणीस अंगद चौधर, खजिनदार आतिब शेख, संघटक प्रतिक कदम, कंपनीचे एच आर मॅनेजर रवी हंगारगे, नचिकेत वसंत गडकर, शामबाबू आकुला, प्रदयुम्न कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला. प्रास्ताविक एच. आर हेड रवी हंगारगे यांनी केले. तसेच, सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे…
झेड एफ इंडिया कंपनीच्या करारानुसार कामगारांना एकूण पगारवाढ २२ हजार ६७८ रुपये इतकी मिळाली आहे. कराराचा कालावधी ३ वर्षांचा आहे. मेडिक्लेम पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, एकूण सुट्या ४७, दुखवटा सुट्टी कामगारच्या घरातील, नात्यामधील (ब्लड रिलेशन)मधील कोणी मयत झाल्यास पगारी सुट्टी ६ दिवस मिळणार आहे. पितृत्व रजा, दिवाळी बोनस, मासिक हजेरी बक्षीस, सेवा बक्षीस, वैयक्तिक कर्ज सुविधा, जादा कामाचा मोबदला, कँटीन व बस सुविधा, ड्रेस, पाल्यांसाठी बक्षीस योजना, गुणवंत कामगार पुरस्कार, तसेच प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १२ महिन्याचा फरक आदी सुविधा देण्यात येणार आहेत.