Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाणे निश्चित

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांकरिता प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानापूर्वी मतदान साहित्याचे वाटप तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व संबंधित साहित्याची स्वीकृती करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या मतदान व मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली असून, या सर्व ठिकाणांना पोलीस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झालेली आहे.

त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. १
(प्रभाग क्र. १०, १४, १५, १९)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण, सेक्टर क्र. २६, पुणे – ४११०४४

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. २
(प्रभाग क्र. १६, १७, १८, २२)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
ऑटो क्लस्टर सभागृह येथील छोटा हॉल, चिंचवड, पुणे – ४११०१९

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ३
(प्रभाग क्र. २, ६, ८, ९)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे – ४११०२६

हेही वाचा      :        सुलक्षणा शिलवंत- धर यांची SRA आणि शहरविकासाबाबत ठाम भूमिका 

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ४
(प्रभाग क्र. २५, २६, २८, २९)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणी, पुणे – ४११०१७

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ५
(प्रभाग क्र. ३, ४, ५, ७)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
कबड्डी प्रशिक्षण संकुलच्या तळ मजल्यावर स्ट्राँग रूम व पहिल्या मजल्यावर मतमोजणी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरीच्या मागे, भोसरी, पुणे – ४११०२६

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ६
(प्रभाग क्र. १, ११, १२, १३)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
घरकुल चिखली टाऊन हॉल, सेक्टर क्र. १७ व १९ दरम्यान, स्पाईन रोड शेजारी, चिखली, पुणे – ४११०६२

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ७
(प्रभाग क्र. २१, २३, २४, २७)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव, पुणे – ४११०३३

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ८
(प्रभाग क्र. २०, ३०, ३१, ३२)
स्ट्राँग रूम व मतमोजणी ठिकाण –
महापालिका कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल)
तळ मजल्यावर मतमोजणी प्रक्रिया व दुसऱ्या मजल्यावर स्ट्राँग रूम

मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आलेली असून नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button