देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी शहरातील गुरूवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद
![The city's water supply was cut off Thursday evening for maintenance and repair work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/pcmc-1-12.jpg)
पिंपरी |
रावेत जलउपसा केंद्रातील देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी गुरूवार दि.०३ जून पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी दि.०३ जून रोजी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल, मात्र शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.०४ जून रोजी शहराचा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि.०३/०६/२०२१ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. दि.०३/०६/२०२१ रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दि.०४/०६/२०२१ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसासाठा करून काटकसरीने वापर करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.