ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहरात आज 13 नवीन रुग्णांची नोंद, 13 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
![The city today registered 13 new patients, discharged 13 coronados](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Coronavirus-3.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 13 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 84 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 70 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 57 रुग्ण गृहविलगीकरणात असून 13 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 6 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 376 आहेत. आज दिवसभरात 705 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 72 हजार 964 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.