कारची काच फोडून चोरली बॅग
![The car's glass was broken and the bag was stolen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pjimage-2021-12-15T210141.142.jpg)
पिंपरी चिंचवड | कारची काच फोडून चोरट्याने आतील बॅग चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एम्पायर इस्टेट जवळील रस्त्यावर चिंचवड येथे घडली.डॉ. शैलेश चिन्नपुलय्या राव (वय 25, रा. सेवधाम हॉस्पिटल शेजारी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांची कार एम्पायर इस्टेट जवळील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली आणि ते खरेदीसाठी जवळच्या दुकानात गेले. खरेदी करून ते परत आले असता त्यांना आपल्या गाडीची काच फोडल्याचे दिसून आले. कारमध्ये ठेवलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली. या बॅगमध्ये टॅब, पावर बॅंक, टी-शर्ट असा एकूण 15 हजार 300 रुपयांचा ऐवज होता. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.