कर्जदाराने बँकेला घातला 29 लाख 52 हजारांचा गंडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Financial-Cheating.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
बँकेकडे गहाण असलेला फ्लॅट बँकेच्या परस्पर विकून त्या रकमेचा अपहार करत बँकेची 29 लाख 52 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फ्लॅट धारक आणि चुकीचे एनओसी देणाऱ्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 ऑगस्ट 2020 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र हिंजवडी शाखा येथे घडला.
श्वेतप्रिया अविनाश झा (वय 31) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय ओमप्रकाश अग्रवाल, दि प्रस्टीन हॉरिझोन सोसायटीचे चुकीचे एनओसी देणाऱ्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या हिंजवडी शाखेत शाखा व्यवस्थापक आहेत. आरोपी विजय अग्रवाल याने फिर्यादी यांच्या बँकेतून व्हिलेज रेसिडेन्सी प्रोजेक्ट या सोसायटी मधील फ्लॅट क्रमांक 304 हा विकत घेण्यासाठी कर्ज घेतले. आरोपीने काही दिवस कर्जाचे नियमित हप्ते भरले. त्यानंतर बँकेकडे गहाण असलेला फ्लॅट माधव मकरंद थत्ते यांना बँकेच्या परस्पर विकला. त्यातून मिळालेली रक्कम स्वतः वापरून बँकेची 29 लाख 52 हजार 35 रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.