breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वी. नगरसदस्य दिनेश यांच्या पाठपुराव्याला यश..

  • उद्यान विभागाने झाडां भोवतालच्या लोखंडी जाळ्या हटविल्या…
  • शहरातील सर्वच ठिकाणच्या झाडांचे ‘ट्रि गार्ड’ काढण्याचीही केली मागणी…

पिंपरी  – स्पाईन रस्त्यालगत छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क परिसरात लोखंडी जाळ्यांच्या आवरणामुळे वयात आलेल्या झाडांना इजा पोहोचत होती. स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या जाळ्या काढण्याबाबत पालिकेकडे पाठपुरावा केला. मागणीची दखल घेत, पालिकेच्या उद्यान विभागाने लोखंडी जाळ्यातुन या झाडांची सुटका केली.

दिनेश यादव म्हणाले, कोरोनामुळे झाडांचे व पर्यायाने ऑक्सिजनचे महत्व लोकांना पटू लागले. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे हवामानात बदल होवून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे धोरण पिंपरी चिंचवड मनपाने ठरविले. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेतला.

रोपण केलेल्या झाडाच्या रोपट्याची निगा राखता यावी, झाडांचे नागरिकांपासून, जनावरांपासून किवां इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता पालिकेने लाखो रुपये खर्च करून, वृक्ष संरक्षक जाळ्या (ट्रि गार्ड) खरेदी केल्या. त्या झाडांच्या रोपांभोवती बसविल्या. आता रोपाचे झाड झाले. जशीजशी या झाडाची वाढ होतेय, तशी ही लोखंडी जाळी या झाडांना त्रासदायक बनू पाहतेय. झाडांभोवतालच्या लोखंडी जाळ्या काढण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर प्रशासनास जाग येऊन त्यांनी प्रभागातील झाडांना त्रासदायक ठरणाऱ्या लोखंडी जाळ्या काढण्याचा उपक्रम सुरु केलाय. त्या माध्यमातून आतापर्यंत ५० ते ६० जाळ्या काढल्या आहेत”.

महापालिकेने शहरात सर्वच ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या रस्त्यावरील झाडांना वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) लावलेली आहे. वाढ झालेल्या वृक्षांची संरक्षक लोखंडी जाळी काढण्यासाठी पालिकेने उचित कार्यवाही करावी. प्रशासनाने तशा तातडीने सूचना द्याव्यात. अन्यथा झाडांचे मोठे नुकसान होऊन पर्यावरण हानी होऊ शकते.

– दिनेश यादव (स्वी. नगरसदस्य, ‘फ’ प्रभाग)…..

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button