आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातून ‘शाश्वत व पारदर्शक’ पिंपरी-चिंचवड संकल्प
राजकीय वार्ता : विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचा भावना

पिंपरी-चिंचवड | आमदार अमित गोरखे आणि महाराष्ट्रातील १५ आमदारांनी १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान लंडन व वेल्स येथे पाच दिवसांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड’ आयोजित या अभ्यासक्रमात जागतिक नेतृत्व, शाश्वत कृषी व्यवस्थापन, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती आणि संसदीय लोकशाही प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यात आला.
दौऱ्यात आमदार गोरखे यांनी वेल्समधील कचरा-पाणी व्यवस्थापन, डिजिटल मॉनिटरिंग, वेळेच्या नियोजनाची शिस्त, तसेच लंडनमधील संसदीय प्रक्रिया आणि युवा नेतृत्वाचा अभ्यास केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कार्यक्षमता डॅशबोर्ड, विभागनिहाय KPIs आणि नागरिकांसाठी खुली माहिती प्रणाली विकसित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच, पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी सौरऊर्जा प्रकल्प, ई-वाहन चार्जिंग नेटवर्क आणि झिरो-कार्बन तंत्रज्ञान राबवण्याची योजना जाहीर केली.
हेही वाचा : Pune Fergusson College : पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सावरकरांची खोली आता सर्वांसाठी खुली!
दौऱ्याच्या शेवटी आमदार गोरखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान भेट देत सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांना प्राधान्य देत लोककेंद्रित प्रशासन उभारण्याचे उद्दिष्ट पुन्हा अधोरेखित केले. प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील मान्यवर उपस्थित होते.
डेटा-आधारित प्रशासन:
प्रत्येक योजनेचा खर्च-लाभ विश्लेषण, डिजिटल मॉनिटरिंग आणि KPIs यांमुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि परिणामाभिमुख बनेल. सर्क्युलर वॉटर इकॉनॉमी आणि रिसायकलिंग तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन शून्य-कार्बन तंत्रज्ञान, सौरऊर्जा प्रकल्प आणि ई-वाहन चार्जिंग नेटवर्क राबवले जातील. युवा नेतृत्वास प्रोत्साहन, वंचित घटकांसाठी कौशल्य विकास आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी प्रशासनाला लोककेंद्रित आणि समतेवर आधारित बनवेल.
“धोरणे जाहीर करणे पुरेसे नाही; ती नागरिकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचली पाहिजेत. पारदर्शकता, शिस्त आणि समाजसन्मुख धोरण हेच आधुनिक प्रशासनाची खरी ओळख आहेत.” शासन व्यवस्थेत केवळ धोरणे जाहीर करणे पुरेसे नाही, तर त्या धोरणांचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. इम्पॅक्ट असेसमेंट, डिजिटल मॉनिटरिंग व उत्तरदायित्व हीच आधुनिक प्रशासनाची खरी ओळख आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक शहरात डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्षम अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे.
– अमित गोरखे, आमदार, विधान परिषद.




