Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“एआय”च्या माध्यमातून संशोधनाला पाठबळ!

शिक्षण विश्व: शाश्वत विकास नवोपक्रम, प्रभाव आणि समावेश" विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद

पिंपरी चिंचवड : आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून नवनवीन संशोधनामध्ये आणखी परिणामकारकरीत्या संशोधन करण्यासाठी प्रेरक पाठबळ मिळेल असे मत आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आले. “शाश्वत विकास: नवोपक्रम, प्रभाव आणि समावेश” या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद १ व २ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली.

ही परिषद एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (देवाची), पुणे, अवंतिका विद्यापीठ, उज्जैन, आणि वेदांत नॉलेज सिस्टीम्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेमध्ये जगभरातील १०० प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यामध्ये विविध क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिषदेमध्ये ६६ संशोधन प्रबंध सादर करण्यात आले, जे परिषदेच्या मुख्य विषयाशी सुसंगत होते. या परिषदेचा एक प्रमुख आकर्षणाचा भाग म्हणजे “AI in Research” (संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयावर १ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आलेली कार्यशाळा होती. या कार्यशाळेमध्ये २५० पेक्षा अधिक सहभागी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

हेही वाचा –  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चर्चा; रशियाची भूमिका स्पष्ट…

परिषदेचे उद्घाटन डॉ. अनंत चक्रदेव, ग्रुप प्रोव्होस्ट, एमआयटी पुणे यांच्या हस्ते झाले. डॉ. नितीन राणे, कुलगुरू, अवंतिका विद्यापीठ यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. बी. बी. वाफारे, संचालक, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (देवाची), पुणे, यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रमुख व्याख्यान डॉ. जयंत सोनवलकर, माजी कुलगुरू, एमपी भोज ओपन युनिव्हर्सिटी, यांनी सादर केले. समारोप सत्राचे मुख्य पाहुणे म्हणून डॉ. संजीव चोप्रा, माजी आयएएस अधिकारी, इतिहासकार व स्तंभलेखक, यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेचे संयोजन डॉ. अमोल माने, उपसंचालक प्रा. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (देवाची), पुणे, तसेच डॉ. हरीश बापट, डॉ. मासुमा मेहता आणि डॉ. अंकुर कुमार रस्तोगी (अवंतिका विद्यापीठ, उज्जैन) आणि आयोजन समिती सदस्य यांनी केले. ही परिषद शैक्षणिक सहकार्य, संशोधन प्रसार आणि अधिक शाश्वत आणि समावेशक भविष्य घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून अत्यंत फलदायी ठरली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button