Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अजिंक्य डी वाय पाटील’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच केली ग्राम स्वच्छता!

शिक्षण विश्व: देहूगाव येथील श्रमदान शिबिरात स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश

पिंपरी- चिंचवड | लोहगाव येथील अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेअंतर्गत श्री क्षेत्र देहूगाव येथे ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच इंद्रायणी घाटाची विद्यार्थ्यांनी सफाई केली. याबरोबरच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण देखील केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग लोहगाव यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र देहूगाव येथे नुकतेच पार पडले.

हेही वाचा : “अहंकार रावण का भी नहीं बचा था..”; केजरीवाल यांच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट 

शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते झाले. देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू नगरपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर व प्राचार्य डॉ एफ बी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे संयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप बाळासाहेब घुले यांनी केले. स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन वृक्षारोपण, प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छता, तुकाराम महाराज संस्थान शिळा मंदिर तसेच गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला. स्वयंसेवकांनी जलसंवर्धन अभियानांतर्गत गावालगतच्या इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छ करून तीर्थक्षेत्र विकास अभियानाचे महत्त्वपूर्ण काम केले. श्रम संस्कारासोबतच स्वच्छता फेरी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करून ग्रामस्थांपर्यंत स्वच्छतेची जनजागृती स्वयंसेवकामार्फत करण्यात आली.

देहू नगराध्यक्ष पूजा दिवटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एफ बी सय्यद, विभाग प्रमुख डॉ पंकज आगरकर, डॉ भाग्यश्री ढाकुलकर, डॉ नागेश शेळके आदींनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. शिबिर कालावधीत सोमनाथ आबा मसुगडे, उत्कर्ष पाटील, सनी पाटील, महेश गिरी, प्रा .अमृता मोरे, प्रा. जयश्री सूर्यवंशी, प्रा.श्रद्धा खंदारे यांचे सहकार्य लाभले. शिबिर कालावधीत विठ्ठल काळोखे यांचे व्यक्तिमत्व विकास, डॉ नाना शेजवळ यांचे डिजिटल साक्षरता, प्राध्यापक रोहित गुरव यांचे मैत्री व बाप, ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे माय युवा भारी आदी विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. शिबिर यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप घुले व अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button