breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांना होणारा स्थानिक गुंडांचा त्रास थांबवा

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सोसायट्या निर्माण होत आहेत. या सोसायट्यांमध्ये बाहेरगावाहून आलेले नागरिक सदनिका घेऊन राहत आहेत. परंतु बाहेरील नागरिकांना स्थानिक गुंड त्रास देत आहेत. त्यामुळे सोसायटीतील पदाधिकारी, सदस्य व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने कृत्य करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून तसेच सोसायटी फेरडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील २० उमेदवार घोषित

निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील बर्‍याच सोसायटींमध्ये स्थानिक गुंडांकडून सोसायटी मॅनेजमेंट कमिटीमधील चेअरमन, सेक्रेटरी इतर पदाधिकार्‍यांना मारहाण केली जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत सोसायटीचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याच्या अनेक तक्रारी सोसायटी फेडरेशनकडे आलेल्या आहेत. तक्रारीची चौकशी केली जात नाही. त्यामुळे असे कृत्य करणार्‍यांना वाव मिळत आहे. २ मार्च २०२४ रोजी पिंपरी येथील महिंद्रा अंथीया या सोसायटीच्या सेक्रेटरीला अशाप्रकारे बाहेरील गुंडांकडून जबर मारहाण झालेली आहे. या मारहाणीच्या बाबत तक्रार केली असता आपल्या पोलीस प्रशासनाकडून त्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली गेलेली नाही. उलट ज्यांना मारहाण झाली त्यांचीच चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. अशाच घटना चिखली, मोशी, चर्‍होली, पिंपरी, पुनावळे, पिंपळे सौदागर, सांगवी, रावेत अशा ठिकाणच्या सोसायटींमध्ये परिसरातील गुंडांकडून दहशत माजवली जात आहे. सर्व गंभीर गोष्टींची नोंद घेऊन मुंबई पोलीस आयुक्तालयाप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात देखील सोसायटीधारकांच्या विविध कायदेशीर समस्यांबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र विभाग करण्यात यावा. त्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची विशेष नेमणूक करण्यात यावी. जेणेकरून अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यावर लवकरात लवकर कारवाई करता येईल.

पिंपरी चिंचवड शहरातील बर्‍याच सोसायट्यांमध्ये असे प्रकार घडत आहेत. परंतु पोलीस प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली येऊन तक्रार नोंदवून घेत नाही. तक्रार नोंदवून घेतली तर योग कलम लावत नाही. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि सोसायटीधारकांच्या संरक्षणासाठी मुंबई शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी एका स्वतंत्र पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक करावी जेणेकरून या सर्व गोष्टींचा तपास लवकर होऊन गुन्हेगारास योग्य ती शिक्षा मिळेल.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button