ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराच्या विविध भागातून सात दुचाकी, एक टेम्पो चोरीला

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना. दररोज शहराच्या विविध भागात चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. रविवारी (दि. 28) पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या दहा घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये सात दुचाकी, एक टेम्पो चोरीला गेला आहे. तसेच निगडी परिसरात दोन महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न तर चाकण येथे घरफोडी करून टीव्ही आणि सिलेंडर चोरून नेला आहे.निगडी परिसरात एका अनोळखी चोरट्याने वृद्ध महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. मात्र महिलेने मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. तरीही चोरट्याने हिसका मारून दहा हजार रुपये किमतीचे अर्धे मंगळसूत्र चोरून नेले. तर आणखी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्याचा त्याच चोरट्याने प्रयत्न केला.

चाकण परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एलसीडी टीव्ही आणि सिलेंडर टाकी असा एकूण 26 हजार दोनशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण, निगडी, भोसरी, पिंपरी, दिघी, तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सात दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तसेच एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन लाख रुपये किमतीचा एक पिकप टेम्पो देखील चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चोरीच्या दहा घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण तीन लाख 59 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रविवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button