चिंचवड गावठाण येथे जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करा
- नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची मागणी
पिंपरी : प्रतिनिधी
चिंचवड गावठाण येथे जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करा अशी मागणी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी केली आहे. या बाबत आयुक्त राजेश पाटील यांना शेडगे यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात नमुद केले आहे की, कोविड 19 चे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने लसीकरण सुरू केले आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 17, 18 व 19 मध्ये सुमारे 1 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे तालेरा मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जेष्ठांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदींसह विविध आजार आहेत. त्यांचे हाल होत आहे. जेष्ठ नागरिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून त्यांच्यासाठी चिंचवड गावठाण येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक शेडगे यांनी निवेदनात केली.