breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा; माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

पिंपरी – पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरातील लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे या भागात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी केली आहे.

वाचा :-पक्षादेश धुडकावून गटनेत्याची पालिकेत मर्दुमकी, शिवसैनिकांची अस्वस्थता चव्हाट्यावर

याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर, रहाटणी मधील लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याने शहरतील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढत आहे.प्रभागातील जेष्ठ नागरिकांना प्रभागात लसीकरण केंद्र नसल्याने इतर ठिकाणी जावे लागत आहे. याचा जेष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर, रहाटणी येथे महापालिका दवाखाना किंवा महापालिका शाळेमध्ये नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात यावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button