गायत्री सखी मंचतर्फे आयोजित हलव्याचे दागिने बनविणे प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिघी परिसरातील महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग; रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न
![Spontaneous response to the Halwa Jewelry Making Training Class organized by Gayatri Sakhi Manch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Gayatri-Sakhi-Manch-780x470.jpg)
पिंपरी | दिघी परिसरातील महिलांकरिता मकरसंक्रांत सणानिमित्त हलव्याचे दागिने बनवणे प्रशिक्षण वर्ग गंगोत्री पार्क भोसरी येथे यशस्वीपणे पार पडला. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक महिलांनी या प्रशिक्षण वर्गातून हलव्याचे दागिने बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.
भाजपा नेते तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री सखी मंच संस्थापक अध्यक्षा कविता भोंगाळे – कडू यांच्यावतीने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नवीन Check-in Rules नेमके काय?
यावेळी बोलताना गायत्री सखी मंच संस्थापक अध्यक्ष भोंगळे-कडू म्हणाल्या, की गायत्री सखी मंच वतीने महिलांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत खास मकर संक्रांती निमित्त हलव्याचे दागिने बनविणे प्रशिक्षण आपण पूर्ण केले असून त्याद्वारे भविष्यात महिला स्वतःचा स्वयं रोजगार व्यवसाय सुरू करतील आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील असा उदात्त हेतू आहे. स्वाती शिर्के, कल्पना धाडसे, कविता पंडित, सुनीता पंडित, जया सांगळूतकर, आरती लांडगे उपस्थित होत्या.