ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अशोक बँकेचे संस्थापक स्व. डॉ. अशोक तुळशीराम शिलवंत यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री समर्थ जनरल हॉस्पिटल व सात्विक पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात मोफत तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : अशोक बँकेचे संस्थापक स्व. डॉ. अशोक तुळशीराम शिलवंत यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त श्री समर्थ जनरल हॉस्पिटल व सात्विक पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उद्घाटन रावेत-किवळे परिसराचे लोकप्रिय नगरसेवक मा. निलेशभाऊ तरस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी श्री समर्थ जनरल हॉस्पिटलचे पटेल सर तसेच वानखेडे सर उपस्थित होते.

हेही वाचा –  रॉयल ‘चॅम्पियन्स’ बंगळुरू! RCBच्या विजयाचा जल्लोष होणार, पण विजयी परेड निघणार का? महत्वाची माहिती समोर

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. डॉ. अशोक तुळशीराम शिलवंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच समाजसेवेची त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत BMD, शुगर व ECG तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी आचार्य शिलरत्न शिलवंत यांनी सर्व मान्यवरांचे व सहभागी नागरिकांचे आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून ती एक जीवनधर्म आहे. स्व. डॉ. अशोक तुळशीराम शिलवंत यांनी घालून दिलेला सेवाभावाचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना दिलेली आदरांजली आहे. अशा आरोग्य शिबिरांमधून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

– आचार्य शिलरत्न शिलवंत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button