ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरचे नेत्रदीपक यश
टीम नॅशोर्न्स ने पटकावली सहा पदके
![Spectacular achievement of PCCOER in Automotive Engineers National Competition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/PCMC-5-780x470.jpg)
पिंपरी | एमएई इंडिया एम-बाहा २०२४ या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी)च्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मधील मेकॅनिकल विभागातील टीम नॅशोर्न्सने सहा पदकांची कमाई करत १ लाख ३० हजार रुपयांची पारितोषिके पटकावली.
मध्यप्रदेशातील प्रितमपूर येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातील शंभरहुन अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. टीम नॅशोर्न्सने सस्पेन्शन व ट्रॅक्शन आणि समग्र फिजीकल डायनॅमिक्समध्ये पहिला क्रमांक, मॅन्युबेरॅबिलिटी आणि कॉम्प्युटर एडेड इंजिनियरिंगमध्ये दुसरा तर अखिल भारतीय व डिझाइन व्हॅलीडेशनमध्ये तृतीय क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. या संघात विनय गुडसे, अनिकेत मांगवडे, प्रियांका पाटील, सुप्रिया यादव आदींचा समावेश होता.
हेही वाचा – खासगी कोचिंग क्लासेसवर केंद्र सरकारचा ‘अंकूश’
गेली अनेक वर्षे पीसीसीओईआरचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सातत्याने यश संपादन करीत आहेत. या चुरशीच्या स्पर्धेसाठी विद्यार्थी व मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक वर्षभर तयारी करीत असतात. स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी महाविद्यालयाकडून आवश्यक निधी, सोयी सुविधा, साहित्य आणि मार्गदर्शन पुरवले जाते.
स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विनय गुडसे, अनिकेत मांगवडे, प्रियांका पाटील आणि सुप्रिया यादव या चार विद्यार्थ्यांना आनंद ग्रुप व रेनो निस्सानने इंजिनियर म्हणून सेवा संधी देऊ केली असून संघातील इतर पाच विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख डॉ. गुलाब सिरस्कर यांनी विजयी संघातील विद्यार्थी, मार्गदर्शक आणि समन्वयक प्रा. सुखदीप चौगुले व प्रा. दीपक बिरादार यांचे अभिनंदन केले.