Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपळे गुरवमध्ये सामाजिक सुरक्षा पथकाचा वेश्या व्यवसायावर छापा
पिंपरी |
पिंपळे गुरव, लक्ष्मीनगरमध्ये सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातील शिवमल्हार बिल्डींगच्या फ्लॅटमध्ये आरोपी भाड्याने राहत होता. त्याने त्या फ्लॅटमध्ये चार परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले.महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला.
मिळालेले पैसे आरोपीने ठेवून घेतले. ७ जुलै रोजी सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश नरेश गोस्वामी (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड विधान कलम ३७० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.




