सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा सत्कार
DIFT फाऊंडेशन, डिफेंस फोर्स लीग व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रम उत्साहात
![Social activist Maruti Bhapkar felicitated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/maruti-bhapkar-1-780x470.jpg)
पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती स्थान असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. डीआयएफटी फाउंडेशन, डिफेन्स फोर्स लीग, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समिती, बौद्ध समाज विकास महासंघ, रयत विद्यार्थी विचार मंच , बुद्ध लेण्या मुक्ति आंदोलन समिती, अशोका बहुद्देशीय संस्था, समता सैनिक दल यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी सुभेदार कृष्णा काटेकर व डिफेन्स फोर्स लीगचे पैरा विंग अध्यक्ष कमांडो रघुनाथ सावंत, डी एफ एल चे डायरेक्टर राजेंद्र जाधव यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम राजेंद्र जाधव राजू भालेराव मनोज गजभार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.
याप्रसंगी डिफेन्स फोर्स लीग संस्थेतर्फे पूर्व सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच अमर जवान स्मारकास सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पित करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.