आतापर्यंत शहरातील तब्बल 32 लाख नागरिकांची स्वॅब टेस्ट
![So far, swab tests of 32 lakh citizens in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/corona-Test.jpg)
पिंपरी चिंचवड | आता पर्यंत शहरातील तब्बल 32 लाख नागरिकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे जी पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 70 ते 75 टक्के आहे. यातील सुमारे पाच लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे.शहरात गेल्या दीड वर्ष कोरोनाने थैमान घातले आहे. या काळात कोरोनाबाधीत सापडल्या नंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आणि स्वॅब टेस्ट करणे, लक्षणे आढळल्यास किंवा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांची सोय रुग्णालयात अथवा कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवणे आदी केले जात होते.
मात्र बाधितांची संख्या वाढल्यानंतर म्हणावे तेवढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. मात्र रोजची संशयितांची संख्याही सुमारे 10 हजारांच्या घरात आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात ही संख्या 25 हजारापर्यंत गेली होती. त्यांच्या टेस्टही झाल्या आहेत. त्यामुळे आजपर्यंत 32 लाख नागरिकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे जी पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 70 ते 75 टक्के आहे.
गेल्या 19 महिन्यात संशयितांच्या ज्या टेस्ट झाल्या त्यामध्ये सुरूवातीला ज्यांना लक्षणे आहेत आणि जे बाधितांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर काही आस्थापनांमध्ये ‘आरटीपीसीआर’ टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्यासाठीही अनेकांनी टेस्ट करून घेतल्या. त्यामुळे बहुतांश पुणेकरांची आरटीपीसीआर टेस्ट झाल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. यामध्ये एखाद्या व्यक्तींच्या दोन-तीनदाही टेस्ट झाल्या आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.