झोपडपट्टी मुक्त प्रभाग अन् सर्वांना घर हाच संकल्प : सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे
![Slum free wards and home for all: Social activist Nilesh Newale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/253fe574-31c5-485d-a502-6dd3cce4bd4b.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
भीमशक्तीनगर परिसर लवकरच झोपडपट्टीमुक्त होणार आहे. एसआरए अंतर्गत झोपडपट्ट्यांचे निर्मूलन होऊन तिथे राहणा-या परिवारांना हक्काचे, सुरक्षित, आरोग्यदायी घर देण्यात येणार आहे. या भागात राहणा-या 1100 पैकी 700 कुटुंबांनी यासाठी पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे, झोपडपट्टी मुक्त प्रभाग होणार असल्यामुळे परिसरातील नागरिक- रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.भीमशक्तीनगर येथे 1100 कुटुंबे वास्तव्य करतात. त्यातील 700 कुटुंबांचा झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्पासाठी पाठिंबा मिळाला आहे. उर्वरित कुटुंबांचा देखील लवकरच पाठिंबा मिळणार असून त्यांनतर पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे. पाठपुरावा, मंजुरी यासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागेल. मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ काम सुरु होईल.
एसआरए अंतर्गत होणा-या झोपडपट्टी निर्मूलनामुळे झोपडपट्टी धारकांना हक्काची, सुरक्षित घरे मिळतील. परिसर स्वच्छ व आरोग्यदायक राहील. निलेश नेवाळे हे विकसक असणार आहेत. झोपडपट्टीमुक्त प्रभाग आणि सर्वांना घर हाच संकल्प असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे म्हणाले.