शिवसेनेचा ‘हाय होल्टेज ड्रमा’ : आमदार लांडगे यांची ‘एन्ट्री’ अन् वाघांची मावळली ‘डरकाळी’!
– पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपा- सेना कार्यकर्ते आमने-सामने
– सेनेचे आजी- माजी खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची आंदोलनात अनुपस्थिती
पिंपरी | प्रतिनिधी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यक्रमानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये शिवसेनेचा “हाय होल्टेज ड्रामा” करण्याचा प्रयत्न होता. परंतु, आमदार महेश लांडगे यांची ‘एन्ट्री’ केल्यामुळे शिवसेनेच्या वाघांची डरकाळी मावळली. त्यांनतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवण्यासाठी २०-२५ सैनिक घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले.महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्ता पदाधिकारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. तसेच, सोमय्या यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सोमय्या यांच्या कार्यक्रमस्थळी भाजपा विरोधात घोषणाबाजी करून “हाय व्होल्टेज ड्रामा” करण्याचे नियोजन शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केले होते. सोमय्या कार्यक्रमस्थळी दाखल होताच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. परंतु, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचा अपवाद वगळता शहरातील आजी- माजी खासदार, प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आंदोलनाला अनुपस्थिती होती. अवघ्या २०- २५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. दुसरीकडे, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सोमय्या यांच्यापुढे ‘एन्ट्री’ केली. त्यावेळी शिवसैनिकांचा घोषणाबाजीचा जोर ओसरला. सोमय्या यांच्या गाडीचा ताफा पुढे गेल्यावर पुन्हा शिवसैनिकांना जोर चढला. सर्व स्थानिक कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांमध्ये महेश लांडगे यांच्याबाबत आदरयुक्त भीती असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
ठाकरे सरकारने ‘स्मार्ट सिटी’ भ्रष्टाचाराची चौकशी करावी: सोमय्या
पिंपरी- चिंचवड महापालिकेतील ‘स्मार्ट सिटी’ योजनेत भ्रष्टचार झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला दिली. ईडी आणि सीबीआय मार्फत किंवा कोणत्याही केंद्रीय संस्थांमार्फत चौकशी करायची असेल तर काही कागदपत्रे द्यावी लागतात. पण, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी यांनी दिलेल्या पात्रांच्या आधारे महाविकास आघाडी सरकारने चौकशी करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे आहेत. त्यांनी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर असलेल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकांकडून माहिती घ्यावी. चुकीची कामे करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.