Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

मुख्यमंत्री हरिनामात दंग; फुगडी खेळण्याचा घेतला आनंद

पुणे : आळंदी – आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी समाधीचे दर्शन घेतले. आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. हरिनामाच्या जयघोषात सुरू असलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी तब्बल सव्वा दोन तास आनंद घेतला. तसेच वारकऱ्यांशी हितगूज करीत फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला.

मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा दुपारी तीन वाजता माऊली मंदिराच्या आजोळघरी आला. तेथूनच मंदिरात प्रवेश करीत त्यांनी समाधीचे दर्शन घेतले. आळंदी देवस्थानच्या वतीने अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे यांनी फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी वीणा मंडपासमोर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

हेही वाचा – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा किती महिलांना लाभ?

सायंकाळी सव्वा पाच वाजता मंदिरातून बाहेर पडत त्यांनी इंद्रायणी नदीची पाहणी केली. यानंतर त्यांनी फडावर भेट देत राणा महाराज वासकर यांच्याशी संवाद साधला. आळंदी नगर परिषदेच्या तुळशी वृंदावन सुशोभीकरणाचे उद्‍घाटन त्यांनी केले. त्यानंतर ते लोहगावच्या दिशेने रवाना झाले.

यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आषाढी वारीसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button