शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये युवा सेनेत ‘इनकमिंग’
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी- अस्मितेसाठी काम करण्याचा संकल्प
![Under the guidance of Sulabha Ubale, leader of the Shiv Sena Thackeray faction, the Yuva Sena is 'incoming'.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Sulbha-Ubale-780x470.jpg)
भोसरीमध्ये विकासाचे नवे पर्व आणण्याचा युवकांनी केला निर्धार
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधोगतीची लाट घालवून, विकासाची लाट आणण्यासाठी अनेक सजग युवक-युवतींनी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व अस्मितेसाठी काम करण्याची इच्छा या युवक युवतींनी जाहीर केली.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इंद्रायणीनगर येथील भिवाजी सहाणे सभागृहात आज पार पडला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेतील पक्षप्रवेश पार पडले. भोसरी विधानसभा प्रमुख धंनजय आल्हाट, माजी नगरसेवक रवी लांडगे, शहर संघटक तुषार सहाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन सानप, भोसरी विधानसभा युवा सेना प्रमुख अजिंक्य उबाळे, तसेच युवराज कोकाटे, अनिल सोमवंशी, शैलेश बापू मोरे, नेताजी काशीद, कैलास नेवासकर, रावसाहेब थोरात, शिवाजी शेळके, प्रवीण राजपूत, अमित शिंदे, शाखा प्रमुख प्रकाश जाधव, कल्पना शेटे आदी उपस्थित होते.
आज पार पडलेल्या कार्यक्रमात ऍड.विद्या एम बगाडे, संतोष राठोड, प्रकाश मोरे, महादेव कदम, ऍड. सतीश भिसे, रवींद्र देवरवाडे, निवृत्ती अमूप, शुभम कांबळे, वाहिब जावळे, आकाश इंगळे, प्रवीण पुजारी, प्रथमेश जाधव, रोहन बुधाळकर, संजय भासकीकर, सुरेंद्र राय, बिक्रम राजपूत, रीना पाटील, विकास बोराडे, मोहन राजपूत, नामदेव, विजया सांगवी, गौरी दुराफे, ज्योती बिराडे, विजया सांगवी, तेजस्विनी बगाडे, रीना पाटील, सिद्धार्थ धाकळे, सौरभ प्रजापती, निखिल शिंदे, सौरव शिलावंत आणि उन्मय जाधव या युवक युवतींचे पक्षात स्वागत करण्यात आले. येणाऱ्या काळात अन्याय आणि भ्रष्टाचार विरोधात लढून भोसरीमध्ये विकासाचे नवे पर्व आणण्याचा या युवकांनी संकल्प केला.