अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्याचे फोटो काढून फोटोची भीती घालून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना जानेवारी 2022 ते 24 मार्च 2022 या कालावधीत मोशी येथे घडली.
विशाल निकम अंदाजे (वय 25, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी घरी एकटी असताना ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करू’ असे म्हणून वेळोवेळी आरोपीने तिच्यासोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्याचे फोटो काढून ते फोटो दाखवून आरोपीने पिडीत मुलीसोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलीसोबत लैंगिक अत्याचार करताना फिर्यादीची आई आणि त्यांच्या शेजारी राहणारा एकजण घरात आले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शेजारच्या व्यक्तीला मारहाण करून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.





