प्रियदर्शनी शाळेच्या सीमा फाटक यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार ‘ प्रदान
शिक्षण विश्व: ब्रेन वर्ल्ड ग्रुप आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड : आळंदी येथील प्रियदर्शनी स्कूलच्या प्राचार्या सीमा फाटक यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२५’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार ब्रेन वर्ल्ड ग्रुप आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत प्रदान करण्यात आला.
हेही वाचा – करियर मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सीमा फाटक यांचे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, अखंड निष्ठा आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत एकत्र आले होते, ज्यांनी प्रियदर्शनी शाळेच्या सर्वांगीण व कौशल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचा गौरव केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
बालकांचे भावी आयुष्य घडवण्यासाठी सातत्याने प्रियदर्शनी शाळा प्रयत्नशील आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समाजाचा जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहे. शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२५’ शिक्षिका सीमा फाटक यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांचा प्रवास इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे
– सरिता सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रियदर्शनी स्कूल, आळंदी