विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने केले दुसरे लग्न; पतीस अटक
पिंपरी चिंचवड | विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. याबाबत पत्नी जाब विचारण्यासाठी गेली असता सासरच्या लोकांनी तिला शिवीगाळ, मारहाण करत घरात न घेता हाकलून दिले. पीडित विवाहितेने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 फेब्रुवारी 2013 पासून 17 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडलापती, सासरा, दीर आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेसोबत अन्य आरोपींच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी पतीला विवाहितेबद्दल भडकावले. पतीने विवाहितेला वारंवार शिवीगाळ, मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकला.
पतीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. याबाबत जाब विचारण्यासाठी विवाहिता आरोपींच्या घरी गेली असता आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून घरामध्ये न घेता हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.