Say NO To Garbage Depot : गहुंजे स्टेडिअमवर भूमिपुत्राने दर्शवला सनदशीर मार्गाने विरोध!
पुनावळेतील अतुल काटे यांचा अनोखा अंदाज : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांग्लादेश सामन्यात क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले
![Say NO To Garbage Depot: Bhumiputra protested at Gahunje Stadium in a legal way!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Atul-Kate-780x470.jpg)
पिंपरी : पुनावळेतील कचरा डेपोची आरक्षित जागा महापालिकेने वनविभागाकडून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू करताच स्थानिक नागरिकांनी विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने भारतात होत आहेत. त्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांग्लादेश सामना शनिवारी गहुंजे स्टेडियमवर होत आहे. त्यादरम्यान काही तरुणांनी हे बोर्ड झळकवून पुनावळे कचरा डेपोकडे लक्ष वेधले.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज १२०० टन ओला आणि सुका कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करून मोशीतील ८१ एकर परिसरातील कचरा डेपोत टाकला जातो; परंतु मोशी डेपोची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिकेने पुनावळेतील आरक्षित जागेवर कचरा डेपो विकसित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहर वाढत असून,
आयटीमुळे पसंती…
हिंजवडी आयटीपार्क असल्याने नागरिक पुनावळेत वास्तव्यास प्राधान्य देतात. गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये उभारली आहेत. प्रस्तावित कचरा डेपोपासून २०० ते ४०० रा मीटर अंतरावर मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. कचरा पोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. कचरा वाहतुकीचे अंतर जास्त आहे. पुनावळे येथे कचऱ्याचे डोंगर उभारले जाणार नाहीत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. बफर झोन निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. कचरा डेपोचे आरक्षण २००८ मध्ये टाकले होते. त्यावेळी नागरीकरण कमी होते. आता पुनावळे भागात एक लाखाहून अधिक नागरिक राहतात.