Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“Run For Unity” : एकतेच्या उत्सवात पिंपरी-चिंचवडकरांचा उत्साही सहभाग!

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संकल्प

भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांची प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड : लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘Run For Unity’ म्हणजेच ‘एकता दौड’ या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या एकतेच्या उत्सवात पिंपरी-चिंचवडकरांनी एकतेचा संकल्प केला, अशी प्रतिक्रिया भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी दिली.

“Run For Unity” हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपायुक्त बापू बांगर, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांच्यासह सर्व वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. शहरातील विविध मार्गांवरून सकाळी या दौडीची सुरुवात झाली. देशाच्या एकात्मतेचा, अभिमानाचा आणि राष्ट्रभावनेचा उत्सव म्हणून हा उपक्रम साजरा करण्यात आला.

मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे म्हणाले की, “‘Run For Unity’ ही केवळ एक स्पर्धा नाही, तर ती आपल्या देशाच्या अखंडतेचा, एकतेचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या संघटनात दाखविलेली दूरदृष्टी आणि नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.”

हेही वाचा –  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन

लांडगे यांनी पुढे सांगितले की, “एक भारत, श्रेष्ठ भारत” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशाच्या विकासाचा पाया म्हणजे एकता, आणि हीच भावना ‘Run For Unity’ या उपक्रमातून दृढ झाली आहे. या कार्यक्रमाद्वारे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. पोलीस अधिकारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “राष्ट्र एकतेचा संकल्प” घेतला. मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी यशस्वी आयोजनाबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे आणि शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी म्हटले की, “एकतेची ही दौड फक्त आजची नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम धावणारी प्रेरणा आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“सरदार पटेलांनी देशाची एकता घडवली; आता ती टिकवणे आणि अधिक बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला आम्ही वास्तवात आणू. एकतेच्या बळावरच आपले राष्ट्र अधिक सक्षम आणि प्रगत होईल.”

– शिवराज लांडगे, मंडलाध्यक्ष, भाजपा पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button