Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध ‘जैसे थे’ : दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली राहणार; आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. सद्य:स्थितीत शहरात दैनंदिन रुग्णसंख्या १५० ते २०० आहे. गेल्या आठवड्यातील कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर ४.३५ टक्के आहे. असे असूनही, शहरातील निर्बंध या पुढेही ‘जैसे थे’ राहणार आहेत. दुकाने दुपारी चारपर्यंतच खुली राहतील. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी (दि.०१) आदेश काढला आहे.शहरामध्ये मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर शहरामध्ये एप्रिल महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आला. मे महिन्यापासून शहरातील बाधितांची संख्या कमी होऊ लागली. त्यानंतर निबंध शिथिल केले जात आहेत. शहरामध्ये दुकानांना दुपारी चारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

या निबंधांमध्ये शिथिलता आणून दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. तसेच नागरिकांकडूनही निर्बंध कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, संभाव्य तिसच्या लाटेचा धोका आणि सर्वच बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेत प्रशासनाने आहे तेच निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्त यांची बैठक झाली. अजित पवार यांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

आयुक्त राजेश पाटील यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार, शहरामध्ये नियम ‘जैसे थे’ असणार आहेत. त्यामुळे दुकानदारांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारनंतर दुकाने बंद करावी लागणार आहेत. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रे व कोचिंग क्लासेस सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील. शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणास मुभा आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button